बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण…- शरद पवार

मुंबई | कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तसेच हे दुरुस्ती विधेयक लवकरात लवकर मांडलं पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शरद पवारांना यावेळी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं. त्यावर विधानसभा अध्यक्षपदाबाबत आमचं काही म्हणणं नाही. ती काँग्रेसची जागा आहे. त्यावर तिन्ही पक्षाने निर्णय घ्यावा. काँग्रेसने उमेदवार दिला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.

दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी र्चा करून येईल असं मला वाटतं, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चिंताही व्यक्त केली.

आंदोलक शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारसोबत नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही. काल भाजपच्या लोकांनी तिथं गोंधळ घातल्याचं ऐकलं. सरकारनं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

‘मी 10 हजारांची फौज घेऊन येईन, एका फटक्यात सरळ करेन’; शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More