बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर बहूचर्चित आणि वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत रद्द

नवी दिल्ली | आज विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सभागृहात कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सभागृृहात पहिल्याच दिवशी गदारोळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी मोठा गदारोळ सुरु केला. विरोधकांनी गदारोळ सुरु केल्यानंतरही संसदेत हे विधेयक पारीत करण्यात आलं होतं. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सभागृहात खासदारांनी गोंधळ सुरु केल्यानंतर सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही सभागृहातील गोंधळ खुप जास्त प्रमाणात वाढल्याने सभापती ओम बिर्ला यांनी अखेर अधिवेशन 12 वाजेपर्यंत स्थगित केलं.

दरम्यान, राहूल गांधी यांनी सकाळीच याबाबत ट्विट करून आज शेतकऱ्यांसाठी नविन सुर्य उगवण्याचा दिवस असल्याचं म्हटलं होतं. त्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ वादळी मुद्द्यांवर होणार चर्चा

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More