देश

काँग्रेसचा ‘हा’ दिग्गज नेता नितीन गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचले आहेत. अहमद पटेल हे आज सकाळी गडकरींच्या घरी दाखल झाल्याचं कळतंय.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे. नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी नितीन गडकरींवर सोपवल्याचं कळतंय. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अहमद पटेल यांनी या भेटीबाबात स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर कुठलीही चर्चा झाली नाही. देशात अपघात होत आहे, यावर माहिती देण्यासाठी आलो होतो, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या