Top News देश

अहमद पटेल यांनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली, पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे आज निधन झाले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “अहमद पटेल यांच्या निधनाने मी दुःखी झालोय. अदमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रसे नेहमी स्मरणात ठेवेल”.

त्यांचा मुलगा फैजलशी बोलून भावना व्यक्त केल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असंही नरेंद्र मोदींनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अहमद पटेल यांनी आज पहाटे 3.30 वाजता अखेरचा श्वास सोडला. तसेच त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.


महत्वाच्या बातम्या-

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”

“…त्यामुळे भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेनं त्यांची जात दाखवली”

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या