‘अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा’, गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी
मुंबई | पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे( Ahilyabai Holkar) जन्मस्थान असलेल्या अहमदनगर(Ahmednagar)जिल्हाचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नाव द्यावं, अशी मागणी गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असणारा भारतातला अहमदनगर हा पहिला जिल्हा असेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
जेव्हा मुगल निजामशाहीत हिंदू संस्कृतीवर हल्ले करत होते, मंदीरे लुटत होते. त्यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांनी अनेक समाजकल्याणाची कामे केली. स्त्रियांना न्याय मिळवून दिला. आज जे काही देशातील सांस्कृतिक वैभव टिकून आहे. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्म भूमी अखंड हिंदूस्थानाची आहे, त्यामुळे त्यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्हाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नाव द्यावं, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.
त्यांचा जन्म अहमदनगर जिल्हातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगरची ओळख करून देताना निजामशाही इतिहासात डोकवता कामा नये. तरी या हिंदुस्थानाच्या प्रेरनास्थान ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या नावाने झाला पाहिजे, अशी तमाम अहिल्यादेवी प्रमींची भावना आहे, त्यामुळे हा निर्णय तातडीने घ्यावा, असंही ते म्हणाले. सर्वांसाठी ही गोष्ट अभिमानास्पद असेन.
यापूर्वी सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असं नाव देण्यात आलं आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांच्या नावे डाक तिकीट प्रकाशित केलं आहे. तसेच त्यांच्या नावे एक पुरस्कार देखील दिला जातो.
थोडक्यात बातम्या-
मान आणि डोक्याच्या कॅन्सरची ‘ही’ आहेत गंभीर लक्षणं, चुकूनही करू नका दुर्लक्ष
राज्यात पुन्हा सत्तापालट होणार?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
‘तू मला या जगातच का आणलंस?’; अभ्यासाला बस म्हणताच चिमुकला आईवर भडकला
अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका!
“बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलात म्हणून काय तुम्ही राजा झालात का?”
Comments are closed.