बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली | लाॅकडाऊनच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. काही व्हिडिओ मजेशीर होते तर काही भावनिक होते. असाच एक पुण्यातल्या आजीबाईंचा व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल. हडपसरच्या आजीबाई त्यांच्या काठीच्या साहसी खेळामुळं प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच आजीबाईंचा सत्कार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला आहे.

पुण्याच्या हडपसरमध्ये राहणाऱ्या आजीबाई म्हणजेच शांताबाई पवार या लाॅकडाऊन काळात हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. आपली आणि अनाथ पोरांच्या उपजीवीका भागवण्यासाठी त्या भर कोरोना काळात साहसी खेळ करण्यासाठी रस्त्यावर आल्या. 85 वर्षाच्या शांताबाई यांचे साहसी खेळ तरूणांना देखील लाजवेल असे होते. तर या कार्यक्रमात त्यांनी सर्वांसमोर त्यांच्या साहसी खेळाचं प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं. यावर सर्वांनी त्यांचं टाळ्यावाजून कौतूक देखील केलं आहे.

दिल्लीत महिला आयोगाकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शांताबाईंचा सत्कार करण्यात आला. मी सध्या 10 अनाथ मुलांना शिकवते आहे. ही काठी फिरवून मी काही पैसे कमवते. मी स्वतः कमवते आणि पोरांना देखील उभं करते. या आधी मी विमानात बसले नाही, पण या कार्यक्रमामुळं पहिल्यांदा विमानात बसले, असं बोलून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

शांताबाई पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्या फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण देशभरात शांताबाई ओळखल्या गेल्या. अभिनेता सोनु सूद आणि इतरही नेते आणि अभिनेत्यांनी तो व्हिडिओ शेअर केला होता. तर सोनु सूदनं शांताबाईंना आर्थिक मदतही केली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास पुण्यात आल्यावर या आजीबाईंची भेट घेतली आणि त्यांना 1 लाख आणि साडी देऊन सत्कार त्यांचा केला होता.

 

  थोडक्यात बातम्या-

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात यावा; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”

मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!

तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More