महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

मुंबई | राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढले.

सुधीर मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचं सांगितलं असता आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा, असा टोला समोर बसलेल्या अजित पवारांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारलं असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटलं आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

थोडक्यात बातम्या-

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या