बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांना भेटा, त्यांनी आपल्यापेक्षा…’; अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना दिला सल्ला

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session : ) दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री असमर्थ ठरले. अजित पवारांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं. यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तारांनाही सल्ला दिलाय.

शरद पवारांना भेटा, त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत, असं सांगत अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना शरद पवारांचा सल्ला घेण्याचं सुचवलं.

आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More