‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

मुंबई |  मनसेला महाआघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे, अशी माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे अजित पवार मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं कळतंय.

कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आज लगेचच मनसेने ‘राजगड’ या पक्ष कार्यालयात एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे.

मनसे आघाडीत सामिल होणार की नाही? हा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार आहेत. थोड्याच वेळात शरद पवार यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठकीला पोहचणार आहेत. तत्पूर्वी या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे हे पोहचले आहेत.

आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी महाराष्ट्राला नवं नातं पाहायला मिळणार का?, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

नेत्यांच्या मुलाकडे की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?

-यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!