अहमदनगर महाराष्ट्र

‘मी आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घेऊ का?’; अजित पवार भडकले

राहुरी | उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी मास्क नसलेले लोक पाहून अजित पवार चांगलेच भडकले.

हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?, असं म्हणत अजित पवारांनी मास्क न नसलेल्यांना झापलं.

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण काळजी घेणं आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले.

ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, सगळे डिटेल्स देतो’; अण्णांचा शिवसेनेला इशारा

सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण!

“2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?”

“मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये”

‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या