मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मागणी

औरंगाबाद | मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई वाढली आहे, त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने आज औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला अजित पवारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले दिवसेंदिवस मराठवाड्यातील परिस्थिती बिघडत चालली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मराठवाड्यात बैठक घ्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा.

दरम्यान, यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

-16व्या वर्षीच प्रियकराकडून बलात्कार; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

-अंतिम सामन्यात भारताला बघून घेऊ; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांची धमकी

-सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा- शिवसेना