पुणे | महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे रात्रंदिवस झटत आहे. स्वत:ची जन्मदात्री रूग्णालयात असताना देखील ते महाराष्ट्राची काळजी घेत आहेत. त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं आहे. (Deputy Cm Ajit Pawar Appriciation Health Minister Rajesh tope)
राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे हे अतिशय उत्तम काम करत आहेत. राजेश टोपे सतत मुख्यमंत्री आणि माझ्या संपर्कात असतात. तसंच आरोग्य विभागातल्या अधिकारी आणि महत्वाच्या डॉक्टरर्सशी देखील त्यांचा आताच्या परिस्थितीत चांगला संवाद आहे, अशा शब्दात त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. (Deputy Cm Ajit Pawar Appriciation Health Minister Rajesh tope)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा अजित पवार यांनी घेतला. यावेळी कोरोनाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे. गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे. लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती
जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर
महत्वाच्या बातम्या-
31 तारीख नाही तर पुढील आदेश निघेपर्यंत दिलेले आदेश पाळावेत- अजित पवार
आता मात्र कहरच झाला; दारू घरपोच पाठवा याचिकेतून केली मागणी
Comments are closed.