बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. यावेळी अजित पवारांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत.

राज्यात करोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलं. यंदा 42 हजार कोटींचं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1.500 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

कोरोनाच्या संकटाचं आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावं लागतंय, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला, असं अजित पवार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला- अजित पवार

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीकरण केंद्रावर आजीबाईंनी साजरा केला 100 वा वाढदिवस, पाहा व्हिडिओ

राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More