Top News महाराष्ट्र मुंबई

“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | जेलमध्ये जितके गुन्हेगार नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, अशी जहरी टीका भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती.  यावर निलेश राणे वाटेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचं का, निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं.

अजित पवारांच्या या प्रत्युत्तरावर निलेश राणेंनी अजित पवारांवर पुन्हा निशाणा साधला आहे. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी  दिला आहे.

फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रिपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचं नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश राणेंच्या या वक्तव्याला अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


थोडक्यात बातम्या-

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

…त्यावेळी ‘ओ साला धनंजय मुंडे’ म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा

धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी

आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात राहू नका- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या