महाराष्ट्र मुंबई

“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

मुंबई |  जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता, असं शरसंधान अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधलं आहे.

भारतीय रिझर्व बँकेने आर्थिक घोटाळेबाजांची यादी जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकांऊटवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये लुटले आहेत. त्यावेळी चौकीदार गाढ झोपेत होता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींवर बँकांच्या आर्थिक घोटाळ्यांवरून चांगलीच टीका होताना पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या