मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडत आहे. यावेळी त्यांनी नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नियमीतपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ केलं आहे. मात्र, जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी सरकारने कोणतीही योजना आणली नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात होता.
शेतकऱ्यांना हेलपाटे न मारावे लागता सरकारनं कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या विकासकामासाठी निधी मिळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 22 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडी सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
“आमची कला म्हणजे तमाशा आणि त्यांची नटश्रेष्ठ”
…म्हणून शरयुच्या आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत!
Comments are closed.