बारामती | ज्या ठेल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पान खाल्लं त्या ठेल्याच्या दुकानदाराला आपले अश्रू आज अनावर झाले. हा प्रकार बारामतीत पाहायला मिळाला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नेहमी त्यांच्या हटके वागण्यामुळे चर्चेत असतात. आज अजित पवारांना पान खाण्याचा मोह झाला आणि त्यांनी पणदरे इथल्या अगदी छोट्याशा स्टॉलवर पान खाल्लं.
अजित पवारांनी त्या दुकानदाराची अगदी नम्रतेने विचारपुस केली. एवढ्यावर तुमच्या संसाराच्या गाडा चालतो का?, दररोज या व्यवसायातून किती पैसे मिळतात?, असे प्रश्न त्यांनी त्या दुकानदाराला विचारले.
दरम्यान अजित पवार यांच्या गावरान आणि रांगड्या स्वभावाचा प्रत्यय बारामतीकरांना आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
महत्वाच्या बातम्या-
–नरेंद्र मोदींचे लोकसभेतील भाषण प्रथेला धरुन नव्हते- शरद पवार
–शिरुरमधून अजित पवारांनी लढण्याची गरज नाही; योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार-शरद पवार
–मोदींसाठी 5 रूपये द्या, ‘फंड’ जमविण्यासाठी भाजपचा नवा ‘फंडा’!
–हाडाच्या शेतकऱ्याने केक कापून साजरा केला बैलाचा वाढदिवस!
–…तर त्या 5 अधिकाऱ्यांना ‘बंगालभूषण’ पुरस्कार देणार- ममता बॅनर्जी