बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाविषयी अजित पवारांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | कोरोनाची परीस्थीती गेल्या दोन वर्षांपासून भयावह असल्याचं पहायला मिळत आहे. या दोन वर्षांत नागरिकांचं अनेक नुकसान झालं. आर्थिक नुकसानासोबतच मानसिक खच्चीकरणंही या कोरोनानं केलं. अशातच आता कोरोनाची लाट आटोक्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोना आटोक्यात येत असला तरी काळजी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाला गांभीर्यानं घ्या, असं अजित पवार यांनी सांगतिलं आहे.

ज्या चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला, त्या चीनमध्ये आज पंधरा पेक्षा जास्त शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका, याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. तो आजार बाहेर पसरू नये. चौथी लाट येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाची चौथी लाट येणार म्हटल्यावर नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाची तिसरी लाट नष्ट होत असताना चौथ्या लाटेविषयी संकेत मिळाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या नियुक्त्या तुमच्याच सरकारच्या काळातील…’; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

‘2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने….’; नितीन गडकरींचं मोठा प्लॅन

धक्कादायक! चीननंतर आता ‘या’ ठिकाणी होतोय कोरोनाचा उद्रेक

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा, म्हणाले…

“मला वाटलं होतं राज ठाकरे हे करुच शकत नाही पण….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More