Top News राजकारण

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार म्हणाले…

मुंबई | एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांचं स्वागत केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे.

“खान्देशासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी खडसे यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. एकनाथ खडसे, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत आहे. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल,” असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केलाय.

खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याकारणाने उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी व्हिडीओ कॉलवरुन उपस्थिती लावत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केलं.

महत्वाच्या बातम्या-

भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे

IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या