Top News महाराष्ट्र

भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार

मुंबई | ‘पोलीस स्मृतीदिना’निमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे. भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीये.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय पोलिसांनी, प्रसंगी देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सरहद्दीवर युद्ध लढलंय. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी ते गेले आठ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढताय.”

ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूसैन्याशी लढण्यापासून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर भारतीय पोलिसांनी अतुलनीय शौर्य गाजवलंय.”

“नागरिकांच्या जिविताच्या, मालमत्तेच्या रक्षणाची, देशातंर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस अनेक आघाड्यांवर लढत असतात. देशात कायदा-सुव्यवस्थेचं रक्षण करुन नागरिकांना सुरक्षित आणि विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे पोलिसच असतात. पोलीस हे आपल्या सुरक्षेच्या बरोबरीने राष्ट्रनिर्माणाचेही काम करीत असतात.”, असंही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकल्या चपला, व्हिडीयो व्हायरल

दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या