सरपंच थेट निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक- अजित पवार

सांगली | सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक असून हे सरकार लोकशाहीचा खून करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. 

उद्या हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेतून निवडू म्हणतील. मात्र सरकारनं ही हेकेखोर वृत्ती सोडायला हवी. वाटलं तर आम्ही सरकारला निर्णयाचा फेरविचार करायची विनंती करु, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. 

दरम्यान, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या