नौटंकी करण्यापेक्षा आमच्यासोबत या, चांगलं सरकार देऊ!

दौंड | राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातही शिवसेना सत्तेत असून ढोल वाजवत आहे. त्यापेक्षा आमच्यासोबत या, राज्याला चांगले सरकार देऊ, असं आवाहन अजित पवार यांनी शिवसेनेला केलं.

दौंड तालुक्यातील पारगाव साळू-माळूमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीनं दौंडमध्ये रमेश थोरात यांना तिकीट दिलं होतं. मात्र काँग्रेसचे पोपट ताकवणे, विकास ताकवणे, राजाभाऊ तांबे विरोधात उभे राहिल्याने राहुल कुल निवडून आले, असं पवार म्हणाले. यावेळी पोपट आणि विकास ताकवणे व्यासपीठावरच उपस्थित होते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या