सांगली | कै.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी येथील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
आबा हे लोकांच्या मनातील नेते आहेत. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. या थोर नेत्याची समाधी असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसित करणार, या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे ‘कै. आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार’ असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
आबा पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ८ कोटी ७० लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून देणार आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…म्हणून नरेंद्र मोदी माझ्या शपथविधीला गैरहजर राहिले- अरविंद केजरीवाल
शेती करताना तरी इंंदुरीकरांनी कामासाठी येणाऱ्या महिलांशी नीट बोलावं- तृप्ती देसाई
महत्वाच्या बातम्या-
“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आजपासून मी प्रत्येक दिल्लीकरांचा मुख्यमंत्री”
…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं; अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला
चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागत आहे- इंदुरीकर महाराज
Comments are closed.