पुणे महाराष्ट्र

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

पुणे | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असं अजित पवार म्हणाले. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं, असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या