शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…
पुणे | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने सत्तेत आल्यावर एक महत्वाचा निर्णय घेतला. शिंदे सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात अनुक्रमे 5 आणि 3 रुपयांची घट केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हलकासा दिलासा मिळाला आहे. यावरुन आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार (MVA) सत्तेत असताना विरोधी पक्ष भाजपकडून 50% टक्के कर कपातीची मागणी केली जात होती. आता ते सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का करत आहेत, असा प्रश्न पवारांनी सरकारला विचारला. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलवर काही प्रमाणात कर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे देखील पवार म्हणाले.
मी अडीच वर्षे अर्थमंत्री राहीलो. मागील अर्थसंकल्पात आम्ही गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्के असलेला टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता. यावेळी हजार कोटींचा भार राज्यसरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे भाजपचे लोक पेट्रोल आणि डिझेलवरचा कर 50% टक्के कपात करा, अशी मागणी करत होते. आता त्यांनी सत्तेत आल्यावर तेवढा का नाही कमी केला?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
आज जरी तीन पाच रुपयांनी किंमत कमी झाली असली तरी, पुढील काही दिवसांत केंद्र सराकार पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवत राहिल. गॅस सिलेंडरचे भाव वाढवलेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहेत. आम्ही राज्यात इतका कर कमी करतो तर दुसरीकडे केंद्र सरकार वाढवते. त्यामुळे आमच्या कामाचा उपयोग शून्य होतो, असेही पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती
देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?
राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
“दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, 165 आमदारांचं पाठबळ तरी… ”
Comments are closed.