बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती मात्र…”

मुंबई | विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव आज संमत झाला. बहुमत चाचणीमध्ये भाजप व शिंदे गटाला 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. आज शिंदे गट आणि शिवसेनेचे अधिकृत सरकार आले आणि त्यांच्या अभिनंदनपर भाषणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकेचे बाण सोडले.

काल (03 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर 164 मतांनी विजयी झाले. त्यानंतर आपल्या भाषणात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले. पवार म्हणाले, एकनाथराव तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते तर माझ्या कानात सांगायचे होते, मी उद्धवजींशी बोलून तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले असते. तुम्हाला तिकडे जायची गरज काय होती? यावेळी अजित पवारांनी भाजपवर सुद्धा टीका केली. जर तुम्हाला शिवसैनिकच मुख्यमंत्री बनवायचा होता तर मग अडीच वर्षांपुर्वी शिवसेना तेच सांगत होती, असा टोला पवारांनी लगावला.

आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती मात्र सर्वांनी उद्धवजींना आग्रह केला आणि शरद पवार साहेबांनी त्यांना जबाबदारी घ्या असे सांगितले म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. त्यापुढे काय झाले हे मला माहित नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी आजच्या भाषणात बंडखोर आमदारांना चांगलेच धारेवर धरले. अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शहाजी बापू पाटील आणि दीपक केसरकर यांना देखील टोला लगावला. तसेच त्यांच्या सुरत, गुवाहाटी, गोवा या ठिकाणच्या प्रवासावरही अजित पवारांनी टीका केली.

थोडक्यात बातम्या – 

कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी भडकले, वाचा सविस्तर

मोठी बातमी! बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

‘छमिया नाच रे’, सेहवागची विराट कोहलीवर खालच्या भाषेत टीका

अमरावती हत्याकांडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी ! बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेला आणखी एक झटका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More