बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये”

मुंबई | लोक म्हणतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये निवडणूका आहेत. तिकडेही गर्दी होते. मग महाराष्ट्रात निवडणूका का नको. टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

मतदान होत नाही तोपर्यंत तिकडले शॉट सगळ्या महाराष्ट्रात दाखवत बसू नका. तिथं निवडणूक असल्याने थोडंसं हे घडणार परंतू ती निवडणूक संपल्या संपल्या तिथं बाकीची नियमावली कडक केली जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

आम्हालाही लॉकडाऊन करायला फार समाधान वाटत नाही. परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतोय की प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने नियमांचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वर्षी लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने नियमांचं तंतोतंत पालन झालं. मात्र आता तसं होताना दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले.

कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट राज ठाकरेंना फोन, केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड

सध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय!; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More