बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार

नागपूर | नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अमित शहांनी शिवसेनेवर सडकून केली. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती, असं अजित पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

…म्हणून उद्घाटनाला अमित शहांना बोलावलं- नारायण राणे

मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा

“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”

नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More