मुंबई | 1991 मध्ये खासदारकीला उभं असताना मी पेट्रोल पंप चालवायला घेतला होता, पण उद्या कुठे भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करतो, अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप दुसऱ्यांना चालवायला दिला, असा किस्सा सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला. यानंतर उपस्थितांमध्ये एक हशा पिकला.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी भागात खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला अजित पवार आले होते. यावेळी ते बोलत होते.
लोकांचा विश्वास हा खरेदी विक्री संघ, दूध संघाच्या पंपावर असतो, कारण इथे भेसळ होणार नाही, असा विश्वास असतो. त्यामुळे तिथे ग्राहक जास्त असतात. आता भेसळीचं प्रमाण जवळपास संपलं आहे, कारण नवीन तंत्रज्ञान आलं आहे. तो टँकर कुठे थांबला, किती वेळ थांबला, काय गडबड झाली, हे समजतं. सीसीटीव्ही कॅमरा असतात, बारकाईने लक्ष असतं, त्यामुळे भेसळीचं प्रमाण कमी झालंय, असं अजित पवारांनी सांगितलं.
सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पेट्रोलचे दर शंभरीपार गेले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, एवढे झपाट्याने हे दर वाढत आहेत, पण वाहनं तर घ्यावीच लागतात, असं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही
शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं
…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Vide
रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!
…शेवटी लेकाने पालिका मुख्यालायत आणलं; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक