पुणे महाराष्ट्र

आर. आर. पाटलांच्या पोलिस बंधूंचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार; अजित पवार भावूक, म्हणाले…

पुणे | आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर भाषण करताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आबा आपल्याला लवकर सोडून गेले, असं म्हणत अजित पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

राजाराम पाटील यांनी भाऊ गृहमंत्री असूनही त्याचं कधीच भांडवल केलं नाही. नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला, तरी तो पोलिस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच गैरफायदा घेतला नाही,  असं म्हणत अजित पवारांनी राजाराम पाटील यांचं कौतुक केलं.

दरम्यान, राजाराम रामराव पाटील जवळपास दोन वर्षांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड!

‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले

‘सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’; काँग्रसेच्या ‘या’ बड्या नेत्यानी केली मागणी

रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या