बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुणे | दिवाळीच्या आधी शाळा सुरु करणं अशक्य आहे. काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आणि त्यानंतर त्याचे परिणामही भोगले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे संकट ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन घोषित केला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. केरळमध्येही करोनाचा प्रादुर्भाव होता पण त्यांनी तो आटोक्यात आणला. आता पुण्यातही कोरोना आटोक्यात आला पाहिजे ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कोरोनाला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

‘ओला दुष्काळ जाहीर करा’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

“परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं, केंद्राने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी”

महिलांसाठी खुशखबर; उद्यापासून महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More