पुणे | आर. आर. पाटील यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर ते आज आपल्यात असते, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली.
बारामतीत आज कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अजित पवार बोलत होते.
आर.आर. पाटील ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी आर. आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पवारसाहेबांना मी याची माहिती दिली. मी देखील आर. आर. पाटील यांना भेटलो, तेव्हा आर. आर. पाटील यांनी हातात हात घेतला आणि दादा, तुमचं दहा वर्षापूर्वी ऐकलं असतं, तर ही अवस्था झाली नसती असं आर. आर पाटलांनी त्यावेळी म्हटल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, आर. आर. पाटील यांची आठवण काढत अजित पवार भावनिक झाले होते. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचं उदाहरणंही उपस्थितांना दिलं.
ट्रेंडिंग बातम्या-
“घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र लांबूनच नमस्कार करा”
वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात…
‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल’; गणेश नाईकांच आव्हाडांना प्रत्युत्तर
पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत- छगन भुजबळ
Comments are closed.