Top News पुणे महाराष्ट्र

चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट- अजित पवार

पुणे | पुण्यात चोरांना पाहुन पोलिसांनी धूम ठोकली होती या घटनेची आठवण काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनाच्या काळात पोलिसांनी आपल्या कामामुळे प्रतिमा उंचावली. मात्र पोलिसांनी चोरांना पाहून पळून जाणं ही घटना पोलिसांच्या प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली असल्याचं पवार म्हणाले.

चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. मात्र अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होत आहे, असं पवार म्हणाले.

दरम्यान, पोलिसांच्या मनोबलावर याचा वाईट परिणाम होतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायला हवी, असं पवारांनी पोलिसांना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या