Top News महाराष्ट्र मुंबई

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

Photo Credit- Facebook Ajt Pawar & sanjay Rathod

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पूजाच्या आत्महत्येशी ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. या प्रकणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये कथित मंत्री अरूण राठोड नावाच्या तरूणाशी संवाद साधत असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनीसुद्धा या प्रकरणावर समोर येत काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं आहे. सध्या राठोड नेमके आहेत तरी कुठे याबाबत सर्वांना प्रश्न पडला आहे. अशातच यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यार आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालायचं काही कारण नाही. कोणीही व्यक्ती असूदे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्याला त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे? याचा विचार करावा लागेल. संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत, असं मला कळलं. त्यांच्यावर आरोप झाले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी माझं राठोड यांच्याशी बोलणं झालेलं नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, पूजाला व्यवसाय करायचा होता. तिचे वडिलही म्हणाले, ती मुलगी आमचा मुलगा होता. तिला पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. दुर्दैवाने बर्ड फ्लूचं संकट आलं. व्यवसाय अडचणीत आले. त्यामुळे संजय राठोड यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकनं योग्य नाही, असंही अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

भारतातील ‘ही’ आहे सर्वात सुरक्षित कार… वाचा सविस्तर

गजानन मारणे जेलमधून सुटलाच कसा- देवेंद्र फडणवीस

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या