बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर खलबतं; भेटीत काय झालं अजित पवारांनी सांगितलं!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीचा माध्यमांनी तपशील विचारल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भेट राजकीय नव्हती अस सांगितलं आहे.

प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यामध्ये आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर हे सिल्वहर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघेही बंद दाराआड चर्चा करणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…’; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना झटका

अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, भेटीसाठी घरी येऊ नका- राज ठाकरे

रेल्वे रुळावर बाईक स्टंट करायला गेला अन् अचानक ट्रेन आली, पाहा व्हिडीओ

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

आषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More