बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास…’; अर्थसंकल्पात महिलांसाठी अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. दुपारी दोन वाजता अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडण्यास सुरवात केली. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे, असं अजित पवार म्हणाले.

तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे. कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून 1 एप्रिल 2021 पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान,राज्यात करोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलं. यंदा 42 हजार कोटींचं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला- अजित पवार

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीकरण केंद्रावर आजीबाईंनी साजरा केला 100 वा वाढदिवस, पाहा व्हिडिओ

राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More