पुणे | राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला आहे.
काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे. त्यामुळे ते याबाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
दिपाली चव्हाण यांची आत्महत्या अत्यंत दुर्देवी घटना आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना आपल्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवूनच काम करायला हवे, या प्रकरणात पोलिस योग्य तो तपास करुन यातील तथ्य शोधून काढतील. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, बारामतीत कोरोनाच्या स्थितीबाबत पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्यांचे पालन प्रशासन स्तरावर कडकपणे करण्यासंदर्भात त्यांनी आज अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
थोडक्यात बातम्या –
स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन
2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!
संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…
“25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या”
खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीतील 2 ज्येष्ठ नेत्यांची अमित शहांसोबत गोपनीय बैठक?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.