बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी अनेकदा हुकली – देवेंद्र फडणवीस

मुंबई | 23 नोव्हेंबर 2019 साली महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. अनपेक्षितरित्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. परंतू त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून फडणवीस आणि अजित पवारांची जोडी ही मिस्ट्री जोडी म्हणून ओळखली जाते. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना चिमटे काढले आहेत.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. तर जुलै महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस असतो. त्यावर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. जुलैमध्ये वाढदिवस असणारेच मुख्यमंत्री होतात का ? त्यावर फडणवीसांनी अजित पवारांना चिमटा काढत उत्तर दिलं. हा प्रश्न अजित पवारांना विचारला तर बरं होईल, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी बऱ्याचदा हुकलीये. त्याबद्दल आता काय बोलायचं. राज्यात अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदापेक्षा अनेक प्रश्न आहेत, असं म्हणत त्यांनी पुढील उत्तर देण्यास टाळलं. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे, असंही फडणवीस म्हणाले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

दरम्यान, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, असंही स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More