बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा शेवटचा इशारा, म्हणाले…

मुंबई | ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्यभरात या संपाचे चांगलेच पडसाद पहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. दोन महिन्यांच्या संपानंतर अद्यापही काही आगारात संप सुरुच आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा इशारा देऊनही संप सुरुच असल्यामुळे एसटी प्रशासनानंही कडक शब्दांत त्यांना इशारा दिला. अनेकवेळा इशारा देऊनही काही कर्मचाऱ्यांनी संप चालूच ठेवला आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचा विचार करावा आणि संप मागे घ्यावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आता एसटी सुरु करुन प्रवाशांचे हाल थांबवले पाहिजेत असं अजितदादांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विलीणीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्माचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र राज्य सरकारनं अनेकवेळा संप मागे घेण्याचं आवाहन केलं. दोन महिन्यात हा संप खूप चिघळलेला पहायला मिळाला. आता पुन्हा अजित पवारांनी शेवटचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता कर्मचारी काय निर्ण य घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन

आता ऑनलाईन परिक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वाॅच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा निर्णय

Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More