बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे महापालिकेच्या प्रश्नांसाठी अजित पवारांची मंत्रालयात बैठक, पण महापौरांना मात्र निमंत्रणच नाही!

मुंबई | पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांसाठी पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली आहे. पण यासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रश्नांसाठी बैठक बोलावली पण महापौरांनाच निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे महानगरपालिकेच्या प्रश्नांसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला महाराष्ट्रातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला महापालिकेचे विरोधी पक्षनेते, स्थानिक आमदार यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या प्रकरणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचं दिसून येत आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सध्या कार्यरत आहेत. दरम्यान, महापौरांना बाजूला सारून अधिकाऱ्यांच्या मार्फतच अजित पवार हे महापालिकेचा कारभार करत असल्याचं यातून स्पष्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासंबंधी भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

“ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल”

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More