बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पोलिसांना आलेल्या धमकीच्या ‘त्या’ मेसेजवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अमरावती | मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ट्राफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅपवर एका पाकिस्तानी नंबर वरून हा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये मुंबईत 26/11 सारखा हल्ला होणार असल्याचं म्हटलंय.

धमकीच्या या मेसेजवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं  अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातले 6 लोक मुंबईतील हल्ल्याचं काम पार पाडणार असल्याचंही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय.  अमरावती दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी मुबंईला आलेली धमकी गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More