बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा पठ्ठ्या बघा…’; भर कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. आज सकाळी बारामतीमध्ये त्यांच्या हस्ते बारामती बाजार समितीच्या फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचं भूमीपूजन झालं. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी आपलया शैलीत चांगलीच टोलेबाजी केली.

कोरोना संकटामुळे सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी राज्याचे दीड लाख कोटी रूपयांचे नुकसान झालं आहे. सर्वांनी नियम पाळले पाहिजेत. मास्क वापरला पाहिजे. हा पठ्ठ्या बघा समोर….तु शुटींग करतोय आणि मास्क काढून ठेवला आहे. सांगू का पोलिसांना कारवाई करायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा, अशी टोलेबाजी पवार यांनी केली.

फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचा बारामतीसह आजुबाजूच्या गावांना फायदा होईल. 1000 कोटी रूपयांचा प्रकल्प राज्यात आपण राबवत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी हे सुविधा केंद्र देणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला मालावर या सुविधा केंद्रात प्रक्रिया करून त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत पाठवणार आहोत, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यापूढे डिझेलवरच्या बस घ्यायच्या नाहीत. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नाही. यावेळी सरकारने मदत केली आहे. खासगी पेट्रोल पंपवाले ओरडत आहेत. आता बारामतीमध्ये गॅस वाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे घरपोच गॅस मिळणार आहे. आजच्या सारखीच नंतरही स्वच्छता दिसली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

महापालिका जिंकायचीच, संजय राऊतांनी टाकलं पहिलं पाऊल

“कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा”

“भाजपकडून ईडी, सीबीआय लावून धमकावण्याचं काम सुरूये, पण आम्ही घाबरत नाही”

“…या नेत्यांमुळे भाजप-शिवसेनेत दुरावा आला”

“देवाच्या सुपर कॉम्प्युटरमुळे कोरोना आला, त्यानेच मरणाऱ्यांची यादी तयार केली”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More