रायगड | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलण्याच्या खासशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवारांनी इतर ठिकाणी किंवा परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांना चिमटे काढले आहेत.
आईवडिल कष्टाने मुलामुलींना शिकवतात. शिक्षणासाठी त्यांना बाहेरगावी पाठवतात. परंतु, मुलं तिकडे गेली की, तिकडेच लग्न करून सेटल होतात. परत यायच नावचं घेत नाहीत. सर्वचं पिढी असं करत नाही. काही पिढीचं असे करते, असं म्हणत अजित पवारांनी फटकेबाजी केली आहे.
आम्हाला मुंबईत जास्त वेळ राहिलो तर कधी बारामतीत जातो, असं होतं. मात्र, काही बंडलबाज पोरं जन्माला येतात. एका वयस्कर वडिलांना मुलाने विमानतळावर सोडलं, हे बरोबर नाही. माणूसकी विसरू नका. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे कायम लक्षाच ठेवा, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. आपला सुसंस्कृतपणा आपण जपला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या एकमेकांचे वाभाडे काढण्याचं, एकमेकांविषयी हिन वक्तव्य करण्याचं काम सुरू आहे. कुठेतरी थांबल पाहिजे, कुठेतरी आवर घातला पाहिजे, असं अजित पवारांनी बोलून दाखवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून ‘या’ टेनिसपटूला आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार दीड लाख रूपये
‘मला काम मिळत नव्हतं म्हणून मी…’, पूनम पांडेने कबूल केली ‘ती’ मोठी चूक
मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…
डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका
Comments are closed.