बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयकर विभागाच्या धाडीनंतर प्रथमच अजित पवारांचा बारामती दौरा, मतदारसंघातील महिला म्हणतात…

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आणि संबंधित कारखान्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीबाबत राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर अनेक राजकीय वाद-प्रतिवाद घडून आलेत. अशातच आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर अजित पवारांनी प्रथमच बारामती दौरा केला. यावेळी अजित पवार यांनी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन केले.

बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांनी तब्बल 52 वर्षांपासून वर्चस्व राखलं आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे बारामतीकरांचं प्रेम अजूनही अजित पवारांवर असल्याचं दिसून येत आहे. बारामती येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली तेव्हा उपस्थित महिलांनी अजित पवार यांचं कौतुक केलं.

‘अजितदादा तुमचं काम एक नंबर आहे. तुम्ही खुप छान काम करता. तुम्ही खुप मोठे व्हा, यशस्वी व्हा, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत’, असं तेथील महिलांनी सांगितलं. तर तुम्ही आम्हाला निवडुन देता म्हणून मी काम करतो, असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थित महिलांचे त्यावेळी आभार मानले.

दरम्यान, आयकर विभागाने अजित पवारांच्या तीन बहिणींच्या घरी त्याचबरोबर अंबालिका साखर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्वर आणि नंदूरबार या कारखान्यांवर धाड टाकली. त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या कार्यालयासह चोरडीया ग्रुप, शिवालिक ग्रुप, डीबी रियालिटी या कंपन्यांच्या मालकाच्या घरीही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या छाप्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?”

आज संध्याकाळपर्यंत ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

“शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळायला लागले की, भाजपला ते सहन होत नाही”

‘काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता….’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

“लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More