टपरीवर गाडी थांबवून अजित पवारांचा भज्यांवर ‘हल्लाबोल’!

हिंगोली | अजित पवारांसह हल्लाबोल यात्रेत सहभागी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेव्हा भूक लागली, तेव्हा त्यांनी चक्क एका टपरीवर गाडी थांबवून चहा आणि भज्यांवर ताव मारला. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा इथे ही घटना घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या सातव्या दिवशी हिंगोलीतील सभेला जात असताना अजित पवार यांना कॉफीची तल्लफ झाली. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडी थांबवायला लावली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आपल्या गाड्या थांबवून पेटपुजा केली. 

चहा आणि कॉफी होईपर्यंत अजित पवार यांनी चहावाल्याशी गप्पा मारल्या तसेच जाताना त्यांनी 100 रुपयांचं बीलही  चुकतं केलं.