Top News देश

“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू”

नवी दिल्ली | जगभर थैमान घातलेला कोरोना व्हायरस आता कुठे आटोक्यात आला आहे. सर्व नागरिक कोरोना लसीची वाट पाहत आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव कोरोना लसीबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू?, जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही, असं अखिलेश यादव यादव यांनी म्हटलं आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिलं आहे.

एकीकडे केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून इतरही लसींवर काम चालू आहे. त्यामुळे यादवांच्या वक्तव्यावरून अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. तर देशभरात आज ड्राय रनचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”

“राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार”

मुकेश अंबानींना मोठा धक्का; सेबीने रिलायन्सला ठोठावला 25 कोटींचा दं

“हिंदू देशविरोधी असू शकत नाही मग गांधींची हत्या करणारा गोडसे कोण होता?”

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या