बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारने देशाचा विश्वासघात केलाय; अखिलेश यादव यांची जोरदार टीका

लखनऊ |  समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसंच चीनवरून आयात करणाऱ्या आलेल्या रॅपीड टेस्ट कीटवरूनही काही सवाल उपस्थित केले आहेत.

कोरोनाच्या या कठीण काळात गुणवत्ता चाचणीशिवाय या किट वापरात आणणं हा जनतेसोबत विश्वासघात आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

गुणवत्ता चाचणीशिवाय या किट वापरात आणणं हा जनतेसोबत विश्वासघात आहे. चूक ध्यानात आल्यानंतर आता टेस्ट स्थगित करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं याविषयी अगोदरच इशारा देणं गरजेचं होतं. इतका मोठा बेजबाबदारपणा करण्यासाठी सरकारनं तत्काळ स्पष्टीकरण ते अगोदर ज्या चाचण्या या टेस्ट किटच्या साहाय्यानं करण्यात आल्या त्यांचे निकाल किती अचूक होते, हेही सांगावं, असं ट्विट करत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, कोरोनाविरोधात लढणाताना आपल्या कोरोनायोद्ध्यांना म्हणजेच डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले सर्व कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांना जर मर आलं तर त्यांना शहीदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“पालघर प्रकरणी 8 तासांत 101 आरोपी ताब्यात, त्यात एकही मुस्लिम नाही, जातीचं राजकारण करू नका”

मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

महत्वाच्या बातम्या-

आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ मेसेज

कोरोनासंबंधी मोदींनी घेतलेले निर्णय जगात सर्वोत्तम; रिसर्च संस्थेचे निरीक्षण

ही नावं त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात; पालघरमधल्या 101 आरोपींची गृहमंत्र्यांकडून नावे जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More