बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

लखनऊ | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 81 जागांवर आली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी याबाबत ट्विट  केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या ‘दीदी ओ दीदी’ या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये  सर्वात दयनीय अवस्था डावे आणि काँग्रेस आघाडीची आहे. नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाही. सुरुवातीपासूनच त्या पिछाडीवर होत्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर होते.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More