बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज आढळले फक्त 2 कोरोनाबाधित रुग्ण

अकोला | गेल्या तब्बल दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जगभराला हैराण करून सोडले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराअभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते.

आज अकोला जिल्ह्यात फक्त 02 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोना जरी आटोक्यात आला असला तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

एकेकाळी कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढणारा जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला अकोला जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे आगेकूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 120 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात अकोला जिल्ह्यातील 04 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

संपुर्ण अकोला जिल्ह्यात सध्या 44 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 56 हजार 507 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात येत असल्याने दिलासादायक वातावरण पसरलं आहे. पण कोरोनाचा नवा डेल्टा प्लस हा विषाणू डोकं वर काढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More