बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव, तरीही कारवाई का झाली नाही?”

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईनंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल नाईक यांच्या मुलीने केलाय.

अर्णव गोस्वामी यांनी 6 कोटी 40 लाखापैकी आमचे 83 लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत. माझ्या वडिलांच्या आणि आजीच्या आत्महत्येला अर्णव गोस्वामीच जबाबदार आहेत, असा आरोप आज्ञा नाईक यांनी केला आहे.

अर्णव गोस्वामी यांनी पैसे बुडवल्याने माझे पती नवा प्रकल्प हाती घेऊ शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली. आम्ही तक्रार केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल म्हणाले…

“अर्णब गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी”

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार- किरीट सोमय्या

“नववीत असताना अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले, गोस्वामींच्या अटकेने करवाचौथला फळ मिळालं”

“गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत?, त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More